pest control

 राजू पालशेतकर हे पत्नी आणि चार वर्षांची मुलगी ऋत्वीसह कासारवडवली येथील डेफोडिल सोसायटीत राहत होते. त्यांच्या घरात १३ मार्चला पेस्ट कंट्रोल(pest control) करण्यात आले होते. पेस्ट कंट्रोलचे(4 year old girl died after pest control) काम दुपारी ३.३० ला संपले. त्यानंतर पाच वाजता कुटुंब घरात गेले तेव्हा पेस्ट कंट्रोलचा वास येत होता. मात्र कुटुंबाने याकडे दर्लक्ष केले.

    ठाणे : ठाण्यामध्ये एक भयानक प्रकार घडला आहे. घरात केलेली पेस्ट कंट्रोलची फवारणी एका ४ वर्षांच्या मुलीच्या जीवावर बेतली आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील कासारवडवली परिसरात ही घटना घडली.

    राजू पालशेतकर हे पत्नी आणि चार वर्षांची मुलगी ऋत्वीसह कासारवडवली येथील डेफोडिल सोसायटीत राहत होते. त्यांच्या घरात १३ मार्चला पेस्ट कंट्रोल करण्यात आले होते. पेस्ट कंट्रोलचे काम दुपारी ३.३० ला संपले. त्यानंतर पाच वाजता कुटुंब घरात गेले तेव्हा पेस्ट कंट्रोलचा वास येत होता. मात्र कुटुंबाने याकडे दर्लक्ष केले. या वासामुळे ऋत्वीला रात्री उलटी झाली. पत्नीलाही उलटीसारखे वाटू लागले. पेस्ट कंट्रोलच्या वासाने मळमळ होत असल्याचे पालशेतकरांना जाणवले. मात्र थोड्या वेळात त्यांना बरे वाटेल म्हणून त्यांनी पुढे काही केले नाही. पण त्रास वाढत गेल्याने पालशेतकरांनी पत्नी आणि मुलीला  १४ तारखेला नोबल हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

    हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यावर उपचारानंतर पत्नीची प्रकृती सुधारली. मात्र मुलीच्या तब्येतीत फार फरक पडला नाही. संध्याकाली त्या ४ वर्षांच्या ऋत्वीचा मृत्यू झाला.