प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

दिवा शहरातील माथार्डी गावात ४ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याची घटना ८ जानेवारी रोजी घडली. मुंब्रा पोलीस ठाण्यात आरोपी पांडुरंग शेलार यांच्या विरोधात भादंवि 376,354,पस्को, ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. मुंब्रा पोलिसांनी आरोपी शेलार याला न्यायालयात नेले असता त्याला १६ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याची माहिती नमुंबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली.

  • आरोपीला १६ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी

ठाणे (Thane).  दिवा शहरातील माथार्डी गावात ४ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याची घटना ८ जानेवारी रोजी घडली. मुंब्रा पोलीस ठाण्यात आरोपी पांडुरंग शेलार यांच्या विरोधात भादंवि 376,354, Posko, ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. मुंब्रा पोलिसांनी आरोपी शेलार याला न्यायालयात नेले असता त्याला १६ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याची माहिती नमुंबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली.

८ जानेवारी रोजी चिमुरडी ही घराच्या समोर खेळत होती. खेळता खेळता शेजारीच राहणाऱ्या आरोपीच्या घरी चिमुरडी गेल्यानंतर नराधम आरोपी पांडुरंग शेलार याने चिमुरडीसोबत कुकर्म केले. चिमुरडी वेठबिगारी करणाऱ्या कष्टकरी कुटुंबातील होती. चिमुरडीची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर आरोपी पांडुरंग शेलार याने कुटुंबियांना जीवे ठार मारण्याच्या धमक्या दिल्या. यामुळे चिमुकलीच्या पालकांनी सदरच्या गंभीर गुन्ह्याची तक्रार दाखल केली नव्हती. मात्र दिव्यातील सुज्ञ नागरिकाने चिमुरडीवर अत्याचार झाल्याची माहिती १०० नंबरवर सांगितल्याने अखेर ९ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अमोल केंद्रे यांनी केला.

१०० नंबरवर पोलिसांना कळविल्याने मुंब्रा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ९ जानेवारी रोजी मुंब्रा पोलीस ठाण्यात अत्याचार, बाललैंगिक प्रतिबंध कायदा २०१२ पॉक्सो नुसार गुन्हा दाखल करून आरोपी पांडुरंग शेलार या नराधमाला अटक केली. त्याला न्यायालयात नेले असता न्यायालयाने नराधमाला १६ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकरणाचा अधिक तपास मुंब्रा पोलीस करीत आहेत.