bag thent

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात पश्चिमेतील दरबार हॉटेलसमोर रिक्षातून उतरून सफरचंद खरेदी करण्यासाठी गेलेल्या महिलेची पर्स अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली आहे. पर्समधील ४६,५०० किमतीचे सोन्याचे दागिने(jewelry theft in kalyan)  घेऊन चोरट्यांनी पोबारा केला.

कल्याण : कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात पश्चिमेतील दरबार हॉटेलसमोर रिक्षातून उतरून सफरचंद खरेदी करण्यासाठी गेलेल्या महिलेची पर्स अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली आहे. पर्समधील ४६,५०० किमतीचे सोन्याचे दागिने(jewelry theft in kalyan) घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. ही घटना बुधवारी घडली.

सुगंधा गायकर या सकाळी११:३० च्या सुमारास दोन मुलांसोबत सासरी जाण्यासाठी घरातून निघाल्या. त्या शिळ डायघर फाट्यावरून रिक्षाने सुमारे १:१५ सुमारास कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील कल्याण दरबार हॉटेलसमोर उतरल्या. यावेळी त्या सफरचंद खरेदी करण्यासाठी गेल्या असताना अज्ञात चोरट्याने पर्स लांबवत पर्समधील ४६,५०० रुपये किमतीच्या दागिन्यांसह पोबारा केला.

याप्रकरणी सुगंधा गायकर यांच्या फिर्यादीनुसार महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एन. ए. कदम करीत आहेत.