कल्याण डोंबिवलीमध्ये ४९८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद,९ जणांचा मृत्यू

आजच्या ४९८ रूग्णांमुळे कल्याण डोंबिवली(kalyan Dombivali corona patients) पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख २२ हजार ७७२ झाली आहे.

    कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका(Corona Paitents in kalyan dombivali) क्षेत्रात आज ४९८ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत १५२० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज ९ मृत्यू झाले आहेत.

    आजच्या ४९८ रूग्णांमुळे कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख २२ हजार ७७२ झाली आहे. यामध्ये ९,९३१ रुग्ण उपचार घेत असून १,११,३८० रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १४६२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ४९८ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-८८, कल्याण प – १३७, डोंबिवली पूर्व – १२१, डोंबिवली प – ११४, मांडा टिटवाळा –२५, तर मोहना येथील १३ रुग्णांचा समावेश आहे.