कल्याण डोंबिवलीत ५२ नवीन रुग्ण- कोरोना रुग्णांची संख्या १३२८

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मागील २४ तासात ५२ नवीन रुग्णांची भर पडली आहे. आजच्या या ५२ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या १३२८ झाली आहे. यापैकी

 कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मागील २४ तासात ५२  नवीन रुग्णांची भर पडली आहे. आजच्या या ५२ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या १३२८ झाली आहे. यापैकी आतापर्यंत ३४ जणांचा मृत्यू झाला असून ६२८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर तब्बल ६६५ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. आजच्या रुग्णांमध्ये कल्याण पूर्वेतील २३, कल्याण पश्चिमेतील १५, डोंबिवली पूर्वेतील ८, डोंबिवली पश्चिमेतील २, आंबिवलीतील २ तर टिटवाळा येथील २ रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये  २५ पुरुष, २५ महिला, १ मुलगा आणि १ मुलगी  आहे.

आजचे हे रुग्ण कल्याण पूर्वेतील म्हसोबा चौक, तिसगाव पाडा, गवळी नगर, गणेश वाडी, पुना लिंक रोड, मिलिंद नगर, आनंद वाडी, एफ केबिन रोड, नेहरू नगर, खडगोळवली रोड, कल्याण पश्चिमेतील रेतीबंदर रोड, गोविंदवादी, वल्लीपिर रोड, घेलादेवजी चौक अहिल्याबाई चौक, रोहिदास वाडा, आधारवाडी, आधारवाडी रोड, उंबर्डे, श्री कॉम्प्लेक्स एरिया, जोशीबाग, डोंबिवली पूर्वेतील पांडुरंग वाडी, पाथर्ली, सागर्ली गाव, सोनारपाडा, डोंबिवली पश्चिमेतील  दिनदयाल क्रॉस रोड,  महात्माफुले रोड, आंबिवली पश्चिमेतील भोईर कंपाउंड अटाळी, आंबिवली पूर्वेतील गणपती चौक मोहना, टिटवाळा येथील बालाजी नगर आणि गोवेली जकात नाका आदी परिसरातील आहेत.