खडवलीत “पोक्सो” अंतर्गत  ५३ वर्षीय नराधमास टिटवाळा पोलिसांनी ठोकल्या बेड्या

चाळीत राहणारी शेजारी अल्पवयीन मुलगी ही आई वडील कामाला गेले असल्याने आपल्या भावंडाबरोबर एकटी असल्याचे पाहत नराधामाने शनिवारी संध्याकाळी ७च्या सुमारास पंखा लावण्याच्या बाहण्याने घरात बोलवुन १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार केला.

टिटवाळा : शेजारी राहत असलेल्या अल्पवयीन मुलीला पंखा लावण्यास मदत करण्याच्या बहण्याने घरात बोलावले, आणि अल्पवयीन मुलीशी बळजबरीने लैगिक अत्याचार केल्याची घटना कल्याण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी (police) ५३ वर्षीय नराधामास अटक केली आहे. (53 year old man arrested)

पोलीस सुत्रांकडून मिळलेल्या माहितीनुसार खडवली परीसरातील चाळीत राहणाऱ्या नराधम इब्राम्ह हुसेन बोबालाई वय ५३(वर्षे) हा राहणार मुंब्रा हा आठ दिवसापूर्वी खडवली येथे चाळीत राहवयास आला होता. चाळीत राहणारी शेजारी अल्पवयीन मुलगी ही आई वडील कामाला गेले असल्याने आपल्या भावंडाबरोबर एकटी असल्याचे पाहत नराधामाने शनिवारी संध्याकाळी ७च्या सुमारास पंखा लावण्याच्या बाहण्याने घरात बोलवुन १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार केला. सदर घटनेने घाबरलेल्या पिडीत अल्पवयीन मुलीने घडलेला प्रकार आपल्या शेजारील शिकवणी शिक्षिका यांस सांगितला.

याबाबत अल्पवयीन मुलीचे आई वडील, शिक्षिका यांनी रविवारी टिटवाळा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत पोलीसांना घडल्या प्रकार सांगितला टिटवाळा पोलिसांनी पिडीत अल्पवयीन मुलीच्या तक्रीरीनुसार नराधम इब्राम्ह हुसेन बोबालाई वर भा.द.वि.कलम ३७६,/ पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करीत नराधमास अटक केली. आरोपी नराधामास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ३ सप्टेंबर पर्यंत पोलीस कस्टडी दिली असुन या प्रकरणी पी. एस्. आय्. प्राची पांगे अधिक तपास करीत आहेत.