Corona Virus Photo

कल्याण : कल्याण डोंबिवली(kalyan dombivali) महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ५३७ कोरोना रुग्णांची(corona patients) नोंद करण्यात आली आहे. तर ५ जणांचा मृत्यू(death) झाला असून गेल्या २४ तासांत ४९६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आजच्या या ५३७ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ३६,६६८ झाली आहे. यामध्ये ५२३७ रुग्ण उपचार घेत असून ३०,६८७ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ७४४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ५३७ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व ६५, कल्याण प.- १७७, डोंबिवली पूर्व १७१, डोंबिवली प- ९१, मांडा टिटवाळा – १६, मोहना येथील १७ रुग्णांचा समावेश आहे.

डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १४३ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, १० रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून, ९ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय, ९ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.