कोरोनाचा वाढता कहर
कोरोनाचा वाढता कहर

गेल्या २४ तासांत ४२९ रुग्णांना डिस्चार्ज (Last 24 hours Discharge) देण्यात आला आहे. आजच्या या ५७८ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ३४,६८६ झाली आहे. यामध्ये ५१३२ रुग्ण उपचार घेत (Active Patient) असून २८,८३३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ७२१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) आज नव्या ५७८ कोरोना रुग्णांची नोंद (New Corona Patients) करण्यात आली आहे. तर ६ जणांचा मृत्यू (Deaths) झाला असून गेल्या २४ तासांत ४२९ रुग्णांना डिस्चार्ज (Last 24 hours Discharge) देण्यात आला आहे. आजच्या या ५७८ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ३४,६८६ झाली आहे. यामध्ये ५१३२ रुग्ण उपचार घेत (Active Patient) असून २८,८३३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ७२१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आजच्या ५७८ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व – १४८, कल्याण प.- २०४, डोंबिवली पूर्व १०२, डोंबिवली प- १०४, मांडा टिटवाळा – १०, मोहना – ९, तर पिसवली येथील एका रुग्णांचा समावेश आहे. डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ११९ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून १८ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून, ६ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय, ११ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, ७ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून, ४ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून, १ रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूल मधून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.