कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोनाबाधितांची संख्या होतेय कमी, गेल्या २४ तासांत ‘इतक्या’ रुग्णांची झाली नोंद

आज नोंद झालेल्या ५८ कोरोना रूग्णांमुळे(Corona Update) पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३७ हजार ९६३ झाली आहे.

    कल्याण : कल्याण डोंबिवली(Kalyan Dombivali) महानगरपालिका क्षेत्रात आज ५८ कोरोना रुग्णांची(Corona Patients) नोंद करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत १०८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज एकही मृत्यू झाला नाही.

    आज नोंद झालेल्या ५८ कोरोना रूग्णांमुळे(Corona Update) पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३७ हजार ९६३ झाली आहे. यामध्ये ९५७ रुग्ण उपचार घेत असून १ लाख ३४ हजार ७६७ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत २२३९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ५८ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-६, कल्याण प -१५, डोंबिवली पूर्व – २१, डोंबिवली पश्चिम – ११ तर मांडा टिटवाळा येथील ५ रुग्णांचा समावेश आहे.