कल्याण डोंबिवलीत ६२ नवीन रुग्ण

एका मृत्यूची नोंद ; कोरोना रुग्णांची संख्या १२२९ कल्याण : कल्याण डोंबिवलीत आज एकाच दिवशी तब्बल ६२ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यापैकी एक जणाचा मृत्यू झाला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका

एका मृत्यूची नोंद ; कोरोना रुग्णांची संख्या १२२९

कल्याण : कल्याण डोंबिवलीत आज एकाच दिवशी तब्बल ६२ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यापैकी एक  जणाचा मृत्यू झाला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मागील २४ तासात ६२   नवीन रुग्णांची भर पडली आहे. आजच्या या ६२ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची  संख्या  १२२९ झाली आहे. यापैकी आतापर्यंत ३४ जणांचा मृत्यू झाला असून ५८०  जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर तब्बल ६१४ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.