कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे ६४ नवे रुग्ण; आज एकही मृत्यू नाही

कल्याण (Kalyan).  कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ६४ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर आज कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाही. गेल्या २४ तासांत ९१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजच्या या ६४ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५८,५७३ झाली आहे. यामध्ये १०२६ रुग्ण उपचार घेत असून ५६,४२९ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १११८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आजच्या ६४ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-८, कल्याण प -१८, डोंबिवली पूर्व –१९, डोंबिवली प – १४, मांडा टिटवाळा -२ तर मोहना येथील ३ रुग्णांचा समावेश आहे. डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ५ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, ७ रुग्ण हे वै. ह.भ.प. सावळाराम म्हात्रे क्रिडा संकुल येथून, ३ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटर मधून व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.