bhivandi rashtrawadi press conference

भिवंडी : भिवंडी(bhivandi rajiv gandhi flyover) शहराच्या मुख्य रस्त्यावर २००६ मध्ये बनविण्यात आलेल्या अडीच किलोमीटर लांबीच्या कल्याण रोड ते बागेफिरदोस मस्जिदपर्यंत बनविलेला राजीव गांधी उड्डाणपूलाची दुरवस्था होऊन तब्बल तीन वर्षे हा उड्डाणपूल अवजड वाहनांसाठी बंद करून शहरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे.या उड्डाणपूलाच्या दुरुस्तीसाठी राज्य शासनाने पालिकेस ७ कोटी देऊनही आजपर्यंत उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे(flyover repair pending) काम सुरू झालेले नाही.

भिवंडी : भिवंडी(bhivandi rajiv gandhi flyover) शहराच्या मुख्य रस्त्यावर २००६ मध्ये बनविण्यात आलेल्या अडीच किलोमीटर लांबीच्या कल्याण रोड ते बागेफिरदोस मस्जिदपर्यंत बनविलेला राजीव गांधी उड्डाणपूलाची दुरवस्था होऊन तब्बल तीन वर्षे हा उड्डाणपूल अवजड वाहनांसाठी बंद करून शहरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे.या उड्डाणपूलाच्या दुरुस्तीसाठी राज्य शासनाने पालिकेस ७ कोटी देऊनही आजपर्यंत उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे(flyover repair pending) काम सुरू झालेले नाही.त्यामुळे शासनाने दिलेले पैसे गेले कुढे असा सवाल उपस्थित करून या उड्डाणपुलाचे काम तात्काळ सुरू करावे अन्यथा उग्र आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष भगवान टावरे यांनी दिला आहे.

राजीव गांधी उड्डाणपूल २००६ मध्ये जे कुमार या ठेकेदार कंपनीने बनवीत असताना या उड्डाणपुलावरील जाडी ही निविदेमध्ये नमूद मोजमापापेक्षा सहा इंच कमी केली. ज्यामुळे या उड्डाणपुलावर भगदाड पडून दुरवस्था झाली. त्यानंतर या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी  या उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूने बॅरिकेटिंग करून अवजड वाहतुकीसाठी बंद केला. ही बाब आयआयटी मुंबई यांनी केलेल्या स्ट्रक्चरल ऑडीटमध्ये उघडकीस आली. मात्र त्यावर कारवाई न करता शासनाने या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी ७ कोटी १३ लाख ७४ हजार ७९ रुपयांची हर्क्युलस स्ट्रक्चर सिस्टीम या ठेकेदार कंपनीची निविदा २० सप्टेंबर २०१९ मध्ये मंजूर करून १२० दिवसात हे काम पूर्ण करण्याचे कार्यदेश दिले. मात्र आजही या उड्डाणपुलाची दुरुस्तीचे काम सुरू न केल्याने शहरातील नागरीक वाहनचालक यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

या निविदेची मुदत संपूनही काम न करणाऱ्या ठेकेदारास निलंबित करून त्यास पाठीशी घळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.शहरातील नागरीकांच्या मनस्तापाचा अंत न पाहता महानगरपालिका प्रशासनाने उड्डाणपुलाची दुरुस्ती तात्काळ करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष भगवान टावरे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे .याप्रसंगी सरचिटणीस ॲड सुनील पाटील ,जब्बार काझी , युसूफ सोलापूरकर ,रसूल खान, नुमान बाऊहुद्दीन आदी पदाधिकारी उपस्थित होते.