लाईव ब्लॉग
अंतिम अपडेटJanuary, 01 1970

LIVE : भिवंडी इमारत दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दु:ख केले व्यक्त

ऑटो अपडेट
द्वारा- Swapnil Jadhav
प्रतिनिधी नवराष्ट्र.कॉम
17:44 PMSep 21, 2020

भिवंडी इमारत दुर्घटनेत आत्तापर्यंत १२ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरु

भिवंडीमध्ये झालेल्या इमारतीच्या दुर्घटनेत आत्तापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. बचावकार्य अजून सुरु आहे.

16:25 PMSep 21, 2020

भिवंडी इमारत दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दु:ख केले व्यक्त

भिवंडीच्या पटेल कंपाऊंडमधील जिलानी अपार्टमेंट इमारत आज, सकाळी कोसळून झालेली दुर्घटना दुःखद आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली! जखमींना वैद्यकीय उपचार उपलब्ध करण्यात आले असून ते लवकर बरे होतील अशी प्रार्थना करतो. 

तसेच घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांची सुखरुप सुटका करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बचाव कार्यात गुंतलेल्या शासकीय अधिकारी,महापालिकेचे अधिकारी, पोलीस,अग्निशमन दल, एनडीआरएफ जवानांच्या प्रयत्नानं सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळेल,असा मला विश्वास आहे. असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. 

 

14:37 PMSep 21, 2020

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भिवंडी येथील इमारत दुर्घटनेची केली पाहणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भिवंडी येथील इमारत दुर्घटनेची पाहणी केली. नागरिकांचा बचाव करण्यासाठी NDRF ची टीम शर्थीचे प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.

13:28 PMSep 21, 2020

भिवंडी इमारत दुर्घटनाग्रस्त मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत

इमारत दुर्घटनेचे खबर मिळताच ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथील दुर्घटनेची पाहणी केली. ठाणे आपत्ती प्रतिसाद दल आणि भिवंडी अग्निशमन दलाचे जवान पहाटेपासून मदतकार्यात गुंतले आहेत. अनेकांना मलब्याखालून सुखरुप काढण्यात यश आले आहे. जखमींना पालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच जखमींची भेट घेऊन एकनाथ शिंदे यांनी विचारपूस केली. इमारत कोसळून मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणार असल्याचे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.

12:32 PMSep 21, 2020

भिवंडी दुर्घटनाग्रस्तांना मदत करण्याचे पंतप्रधान मोदींनी दिले आश्वासन

भिवंडीमधील जिलानी इमारत दुर्घटनेनंतर नरेंद्र मोदी यांनी नुकतेच एक ट्विट केले आहे, त्यांनी म्हटले आहे की, या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांनी श्रद्धांजली अर्पण केली. तसेच दुर्घटनेत जखमी झालेल्या नागरिक लवकरात लवकर बरे व्हावेत. अशी प्रार्थना करतो, आणि दुर्घटनाग्रस्तांना योग्य ती मदत केली जाईल. असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे.


 

12:27 PMSep 21, 2020

भिवंडी इमारत दुर्घटनेची एकनाथ शिंदेनी केली पाहणी

भिवंडी पटेल कंपाउंड येथील जिलानी इमारत केसळून दुर्दैवी घटना घडली आहे. याठिकाणी हजर राहून सुरु असलेल्या मदतकार्याची पाहणी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

12:03 PMSep 21, 2020

भिवंडी येथील इमारत दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं दुःख

भिवंडी येथील इमारत दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना प्रकट केल्या आहेत.  मुख्यमंत्री ठाकरे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी देखील बोलले असून बचाव कार्य व्यवस्थित व काळजीपूर्वक पार पाडण्याचे तसेच जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

09:54 AMSep 21, 2020

देशात आजपासून 'या' 10 राज्यात अटी शर्थींसह शाळा सुरू

देशातील १० राज्यांमध्ये योग्य ती काळजी घेऊन इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरु करण्यात येणार आहेत.

बिहार, राजस्थान, हरियाणा, चंदिगड, हिमाचल प्रदेश, जम्मू-कश्मीर, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मेघालय, नागालँड या राज्यांत आजपासून ५० टक्के उपस्थितीसह शाळा सुरु करण्यात येणार आहेत. तर उत्तर प्रदेश, झारखंड, दिल्ली, पंजाब, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि पश्चिम बंगाल येथे शाळा अद्याप सुरू करण्यात येणार नाहीत. महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आता शाळा सुरू करता येणार नसल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

09:50 AMSep 21, 2020

सोलापूर जिल्हा बंदमध्ये आंदोलकांनी पंढरपूर पुणे महामार्ग रोखला

मराठा आरक्षण स्थगिती आज पुकारलेल्या सोलापूर जिल्हा बंदमध्ये आंदोलकांनी पंढरपूर पुणे महामार्ग रोखला आहे. वेळापूरच्या पुढे असणाऱ्या निमगाव पाटीजवळ मराठा तरुणांनी रस्त्यावर टायर पेटवून रस्ता अडवला. एक मराठा लाख मराठा च्या घोषणा देत दोन्ही बाजूंची वाहतूक रोखली आहे. 

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी (Bhiwandi) येथे तीन मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली (building collapse) आहे. ठाणे (Thane) महानगरपालिकेच्या पीआरओने सोमवारी सकाळी सांगितले की, ठाण्याच्या भिवंडी शहरात तीन मजली इमारत कोसळल्यामुळे कमीतकमी आठ जणांचा मृत्यू  झाला आहे आणि अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सुरुवातीच्या माहितीनुसार, स्थानिक नागरिकांनी व अधिकाऱ्यांनी मलब्यातून २५ लोकांची सुटका केली आहे. मात्र अद्याप सुमारे २० ते २५ जण अडकल्याची भीती असून बचावकार्य सुरू असल्याचे एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.


जिलनी अपार्टमेंट हाऊस नंबर ६९ ही इमारत १९८४ साली बांधली गेली होती. स्थानिकांनी सांगितले की, पहाटे ३.२० च्या सुमारास पटेल कंपाऊंड परिसरात गोंधळ उडाला. २१ फ्लॅट असलेली अर्धा इमारत रात्री उशिरा कोसळली तर अनेक रहिवासी झोपले होते, असे समजते आहे.


खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये अधिकाऱ्यांनी एका मुलाला मलब्यातून वाचवले आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
दिनदर्शिका
२५ रविवार
रविवार, ऑक्टोबर २५, २०२०

'Fake TRP' प्रकरणी पोलिसांनी वृत्तवाहिन्यांवर केलेली कारवाई योग्य आहे, असे वाटते का?

View Results

Loading ... Loading ...
Advertisement
Advertisement