कल्याण डोंबिवलीमध्ये ८५ नव्या रुग्णांची नोंद, एकाचा मृत्यू

कल्याण डोंबिवली(Kalyan Dombivali) महानगरपालिका क्षेत्रात आज ८५ कोरोना रुग्णांची(Corona patients) नोंद करण्यात आली आहे.

    कल्याण : कल्याण डोंबिवली(Kalyan Dombivali) महानगरपालिका क्षेत्रात आज ८५ कोरोना रुग्णांची(Corona patients) नोंद करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत १३६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज एक मृत्यू झाला आहे.

    आजच्या या ८५ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३६ हजार ५८ झाली आहे. यामध्ये १०४४ रुग्ण उपचार घेत असून १ लाख ३२ हजार ७९८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत २२१६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ८५ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-२८, कल्याण प – १६, डोंबिवली पूर्व – १९, डोंबिवली पश्चिम – ६, मांडा टिटवाळा – १२, मोहना – ३ तर पिसवली येथील १ रुग्णांचा समावेश आहे.