कल्याण डोंबिवलीमध्ये केवळ ८८ कोरोना रुग्णांची नोंद, १५४ जण झाले कोरोनामुक्त

कल्याण डोंबिवली(Kalyan Dombivali) महानगरपालिका क्षेत्रात आज ८८ कोरोना रुग्णांची(Corona Patients In Kalyan Dombivali) नोंद करण्यात आली आहे.

    कल्याण:कल्याण डोंबिवली(Kalyan Dombivali) महानगरपालिका क्षेत्रात आज ८८ कोरोना रुग्णांची(Corona Patients In Kalyan Dombivali) नोंद करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत १५४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज २ मृत्यू झाले आहेत.

    आजच्या या ८८ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३४ हजार ५११ झाली आहे. यामध्ये १३९९ रुग्ण उपचार घेत असून १ लाख ३० हजार ९१६ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत २१९६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ८८ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-१०, कल्याण प – २८, डोंबिवली पूर्व- २३, डोंबिवली प – २१, मांडा टिटवाळा येथील ६ रुग्णांचा समावेश आहे.