कल्याण डोंबिवलीमध्ये ८९ नव्या कोरोना रुग्णांची भर, १५४ जणांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवली(Kalyan Dombivali) महानगरपालिका क्षेत्रात आज ८९ कोरोना रुग्णांची(Corona Patients In Kalyan Dombivali) नोंद करण्यात आली आहे.

    कल्याण : कल्याण डोंबिवली(Kalyan Dombivali) महानगरपालिका क्षेत्रात आज ८९ कोरोना रुग्णांची(Corona Patients In Kalyan Dombivali) नोंद करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत १५४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज २ मृत्यू झाले आहेत.

    आजच्या या ८९ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३४ हजार ८६७ झाली आहे. यामध्ये १४४७ रुग्ण उपचार घेत असून १ लाख ३१ हजार २१६ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत २२०४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ८९ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-१३, कल्याण प – ३०, डोंबिवली पूर्व – २९, डोंबिवली प – १५, तर मोहना येथील २ रुग्णांचा समावेश आहे.