95 year old lady from Kalyan

कल्याण येथील स्टार सिटी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ९५ वर्षाच्या आजीबाईंनी कोरोना लस(95 year old woman took corona vaccine) घेऊन एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. डोंबिवली पश्चिम येथे राहणाऱ्या शकुंतला देवरुखकर या लसीकरणासाठी आल्यावर डॉक्टरांतर्फे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

    कल्याण : देशात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा(corona vaccination third phase) सुरू झाला असून अनेक वृद्ध व्यक्ती लस घेण्यासाठी पुढे येत आहेत. कल्याण येथील स्टार सिटी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ९५ वर्षाच्या आजीबाईंनी कोरोना लस(95 year old woman took corona vaccine) घेऊन एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. डोंबिवली पश्चिम येथे राहणाऱ्या शकुंतला देवरुखकर या लसीकरणासाठी आल्यावर डॉक्टरांतर्फे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

    कोरोना संक्रमण डोंबिवली व कल्याण येथे वाढत असून लसीकरणाची संख्या वाढविणे गरजेचे आहे असे मत स्टारसिटी हॉस्पिटलचे फीजिशियन डॉ. प्रदीप शेलार यांनी व्यक्त केले. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) च्या मते, विषाणूच्या शरीरात पोहोचण्याची आणि लक्षणे दर्शविण्याचा कालावधी दरम्यान १४ दिवसांचा कालावधी असू शकतो. काही संशोधकांचा असं ही वाटतं की ही वेळ २४ दिवसांपर्यंत असू शकते.या आजाराची सुरुवातीची लक्षणे सर्दी आणि तापासारखीच आहेत ज्यामुळे एखादी व्यक्ती सहज गोंधळात पडू शकते. वृद्ध व्यक्ती आणि श्वसनाच्या आजाराने पीडित (दमा), मधुमेह आणि हृदयविकार यासारख्या समस्यांना सामोरे जाणारे लोक कोरोनामुळे गंभीर आजारी पडण्याची शक्यता असते.भारतात लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यातच ३ कोटी लोकांना लस दिली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ही संख्या ३० कोटींवर नेण्याचा केंद्राचा मानस आहे.