पालघरमध्ये ३४ वर्षीय व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह अल्याने औद्योगिक वसाहतीत खळबळ

वाडा - पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील एका ३४ वर्षीय व्यक्तीची कोरोना पॉझिटिव्ह म्हणून पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात भर पडलीय. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील भागात कोरोना पॉझिटिव्ह एकाने भर

 वाडा – पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील एका ३४ वर्षीय व्यक्तीची कोरोना पॉझिटिव्ह म्हणून पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात भर पडलीय. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील भागात  कोरोना पॉझिटिव्ह एकाने भर पडलीय. या रुग्णाच्या संपर्कातील १० जणांना तपासणी करिता ताब्यात घेण्यात आले असून हा रुग्ण ज्या इमारतीत राहत होता तो इमारती परिसर सिल करण्यात आला आहे. अशी माहिती तालुका वैधकिय अधिकारी अभिजित खंडारे यांनी दिली.पालघर जिल्ह्यातील वसई,पालघर,डहाणू या ग्रामीण भागात एकूण २१ रूग्ण संख्या झाली आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात येतेय.

पालघर जिल्ह्यातील बोईसर तारापूर येथे मोठी औद्योगिक वसाहत आहे. या परिसरात हा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे.या परिसरात सदर व्यक्ती हा आपल्या जवळच्या नातेवाईकाच्या उपचाराच्या करिता तो मुंबईतील एका रुग्णालयात ये जा करीत होता. त्याची चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने  त्याला उपचारासाठी पालघर ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. त्याच्या संपर्कातील १० जणांना ताब्यात घेण्यात आले असून हा रहिवाशी परिसर सिल करण्यात आल्याची माहिती देण्यात येतेय. या रुग्णाच्या संपर्कातील आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सदर रुग्ण क्र.२१ – बोईसर येथील ३४ वर्षीय रुग्ण ग्रामीण रुग्णालय पालघर येथे उपचाराकरिता  दाखल आहे सारीची लक्षणे असल्याने कोरोना  चाचणी करण्यात आली व त्यात हा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला सदर व्यक्तीचा मुंबई येथे प्रवासाचा इतिहास आहे.असे जिल्हा प्रशासनाकडून माहिती देण्यात येतेय.