A BJP MLA's cars tragic accident in which a two-wheeler driver was killed and a woman was seriously injured

अपघातात आमदाराची गाडीचे नुकसान झाले असून आमदार कथोरे देखील जखमी झाले असून त्यांच्यावर बदलापूर येथील रुग्णलयात उपचार सुरू आहे. मात्र कार मधील जखमी आणि मृतक दुचाकी चालकाचे नाव समजू शकले नाही.

कल्याण : मुरबाड मतदार संघातील भाजपचे आमदार किसन कथोरे (BJP MLA Kisan Kathore) यांच्या कारने एका दुचाकी चालकाला (two-wheeler driver) जोरदार धडक दिल्याने दुचाकी स्वारचा मृत्यू झाला आहे. तर एक महिला गंभीर असल्याचे समोर आले आहे. हि घटना मुरबाड तालुक्यातील दहागाव आपटी रस्त्यावर घडला असून घटनास्थळी कल्याण तालुका पोलीस दाखल झाले आहे.

या अपघातात आमदाराची गाडीचे नुकसान झाले असून आमदार कथोरे देखील जखमी झाले असून त्यांच्यावर बदलापूर येथील रुग्णलयात उपचार सुरू आहे. मात्र कार मधील जखमी आणि मृतक दुचाकी चालकाचे नाव समजू शकले नाही. तर दुचाकी वरील दुसरी महिला गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अपघात एवढा भीषण होता कि, दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू होऊन दुचाकी वरील महिला रस्त्याच्या लगत असलेल्या शेतात उडून पडली होती. त्यामुळे तीही गंभीर जखमी झाली आहे.