फडके मैदानातील भाजीवाल्यांकडून खंडणी वसुलीच्या तक्रारीबाबत दोघांवर गुन्हा दाखल

कल्याण :- क.डो.म.पा क्षेत्रात कोरोना साथीच्या प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिका क्षेत्रातील भाजी विक्रेत्यांच्या वाहनांचे नियोजन महापालिका परिसरात विविध ८ ठिकाणी करण्यात आले आहे, असे

कल्याण :- क.डो.म.पा क्षेत्रात कोरोना साथीच्या प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिका क्षेत्रातील भाजी विक्रेत्यांच्या वाहनांचे नियोजन महापालिका परिसरात विविध ८ ठिकाणी करण्यात आले आहे, असे असतानाही सदर ठिकाणांपैकी काही ठिकाणी किरकोळ भाजीच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे सदर ८ ठिकाणावर वैयक्तिक भाजी खरेदीसाठी नागरिकांनी जाऊ नये, असाही आदेश निर्गमित करण्यात आला होता. 

सदर मैदानात गर्दीचे नियंत्रणासाठी ‘क’ प्रभाग फेरीवाला हटाव पथकातील एका सत्रात १२ कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. सदर मैदानावर जॉगिंग ट्रकवर १०x१५ चौ. फुटाचे ५३ चौकोन तयार करून त्यामध्ये एका दिवशी ३६ व दुसऱ्या दिवशी ३७ व्यापाऱ्यांना बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सदर ठिकाणी भाजीवाल्याचकडून प्रशांत माळी, किशोर पटेल हे खंडणी वसूल करतात अशा स्वारुपाच्या७ तक्रारी व्हॉसटअॅपवर प्राप्ते झाल्या ने प्रशांत माळी, किशोर पटेल हे महापालिकेचे कर्मचारी नसल्याडने त्यांॉचे विरुध्दह बाजारपेठ पोलिस स्थाानक येथे फौजदारी गुन्हा् दाखल करणेबाबत क प्रभागक्षेत्र अधिकारी यांना कळविण्याात आले आहे. 

व्याापा-यांना सदरचे मैदान हे विनामुल्यध उपलब्धळ करुन देण्यालत आले असून त्या बाबत कोणतीही फी आकारण्याीत येत नाही, त्या्मुळे कोणीही पैशाची मागणी करीत असेल त्यां ची नावे महापालिकेकडे ०२५१-२२११३७३ या हेल्पश लाईनवर कळविण्याात यावी, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यायत येत आहे.