राज्यातील आरोग्य प्रशासनावर प्रचंड ताण ; कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी झगडतोय वॉकरशिवाय चालताही न येणारा डॉक्टर

डॉ. अशोक गीते हे मीरा भोईंदर महापालिका क्षेत्रातील पंडित भीमसेन रुग्णालयात कार्यरत आहेत. देशात कोरोना विषाणूने शिरकाव केल्यापासून ते कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत. अशात त्यांनाही गेल्या वर्षी कोरोना विषाणूची लागण झाली होती.

    मिरा भाईंदर: राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग (Corona Pandemic) वेगाने वाढत आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य प्रशासनावर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. अशात कोरोना विषाणूच्या (Corona virus) भीतीनं अनेकांनी वैद्यकीय क्षेत्राला रामराम ठोकला आहे. त्यामुळे राज्यात वैद्यकीय कर्मचाऱ्यांची आणि डॉक्टरांची प्रचंड कमतरता जाणवत आहे. अशी एकंदरित परिस्थीती असताना डॉ. अशोक गीते (Dr. Ashok gite) यांचं कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

    वॉकरशिवाय चालूही न शकणारे डॉ. अशोक गीते कोरोना रुग्णांना वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालत आहेत. ते वॉकरच्या साह्याने प्रत्येक कोरोना वॉर्डात जाऊन रुग्णांवर उपचार करत आहेत. डॉ. अशोक गीते हे मीरा भोईंदर महापालिका क्षेत्रातील पंडित भीमसेन रुग्णालयात कार्यरत आहेत. देशात कोरोना विषाणूने शिरकाव केल्यापासून ते कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत. अशात त्यांनाही गेल्या वर्षी कोरोना विषाणूची लागण झाली होती.

    सध्या त्यांनी कोरोना विषाणूवर मात केली असली तरी, दरम्यानच्या काळात कोरोना विषाणूवर घेतलेल्या औषधांचा त्यांच्या आरोग्यावर साइट इफेक्ट झाला आहे. परिणामी त्यांना हिपज्वाईंडमध्ये एवैस्कुलर नेकरोसिस ( ए.वी.एन.) या दुर्धर आजारानं ग्रासलं आहे.