A drunken dumper driver hit four vehicles

भिवंडी :  डंपरच्या धडकेत एका टेम्पोचा चक्काचूर झाला असून, टेम्पो चालक जागीच ठार झाला आहे. भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी – अंबाडी रोडवर सोमवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.

टेम्पोला चिरडल्यानंतर डंपर चालक पलायन करण्याच्या प्रयत्नात होता. यावेळी त्याने एक स्विफ्ट कार आणि टेम्पोला धडक दिली. यानंतर त्याने एका बाईकस्वाराला उडवले. या अपघातानंतर येथील स्थानिक तरुणांनी या डंपर चालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

माधव धोंडूबा ठगे (५०) असे डंपर चालकाचे नाव आहे.  या घटनेनंतर अंबाडी नाका येथील पोलीस चौकीमध्ये परिसरातील शेकडो तरुण व नागरिकांनी जाऊन सदर चालकावर कडक कारवाईची मागणी केली.