A fire broke out in a factory in Taloja industrial estate, killing a firefighter
प्रतिनिधिक फोटो

तळोजामध्ये औद्योगिक वसाहतीत भूखंड क्रमांक जे-३९ स्थित असलेल्या मोदी केमिकल या रसायनांवर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्याला रात्री १२ च्या सुमारास आग लागली होती. या घटनेची अग्निशमन माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले.

नवी मुंबई : तळोजा औद्योगिक वसाहतीमधील (Taloja industrial estate) कारखान्यात लागलेल्या भीषण आगीत अग्निशमन दलाच्या १ जवानाचा मृत्यू झाला आहे. इतर जवानांचाही श्वस गुदमरल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीवर नियंत्रण मिळवताना गुदमरुन मृत्यू झालेल्या जवानाचे नाव बाळू देशमुख असं आहे.(fire broke out in a factory in Taloja industrial estate)

तळोजामध्ये औद्योगिक वसाहतीत भूखंड क्रमांक जे-३९ स्थित असलेल्या मोदी केमिकल या रसायनांवर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्याला रात्री १२ च्या सुमारास आग लागली होती. या घटनेची अग्निशमन माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. रात्रभर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी आपल्या प्राणाची बाजी लावली. पहाटे उशीरा आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. पंरतु यामध्ये एका जवानाचा गुदमरुन मृत्यू झाला आहे. या मृ जवानाचे नाव बाळू देशमुख असे आहे.

तसेच इतर जवानांचाही श्वास गुदमरल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या जखमी जवानांना जवळच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या जखमींमध्ये औद्योगिक क्षेत्रातील अग्निशमन दलाचे प्रमुख दीपक दोरुगडे यांचाही समावेश आहे.