भिवंडीत कपड्यांच्या गोदामाला भीषण आग, अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

भिवंडीतील सरवली एमआयडीसीमधील कपिल रेयॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला भीषण आग लागली. आगीत कोट्यवधी रुपयांच्या मशीन, कपडा जळून खाक झाल्याची माहिती आहे. ही कंपनी दोन मजली आहे. पहाटे आग लागल्यानंतर भिवंडी महापालिकेच्या २ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

भिवंडी : भिवंडीच्या एमआयडीसी परिसरात कपड्यांच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज (गुरूवार) पहाटेच्या दरम्यान घडली. या घटनेची माहिती अग्निशामक दलांना मिळताच, अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तसेच आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

भिवंडीतील सरवली एमआयडीसीमधील कपिल रेयॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला भीषण आग लागली. आगीत कोट्यवधी रुपयांच्या मशीन, कपडा जळून खाक झाल्याची माहिती आहे. ही कंपनी दोन मजली आहे. पहाटे आग लागल्यानंतर भिवंडी महापालिकेच्या २ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

आगीचे लोळ सर्वत्र पसरले असून मोठा भडका उडाल्याचं चित्र आहे. मात्र, या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. परंतु ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये.