डोंबिवलीमध्ये बंद घरातील लाकडी वस्तूंना भीषण आग, वस्तू पूर्णपणे जळून खाक

डोंबिवली पूर्वेतील फडके रोडवर प्रियदर्शनी नावाची तळ अधिक १ मजल्याची इमारत आहे. या इमारतीमधील पहिल्या मजल्यावर बंद असलेल्या घरात नको असलेल्या लाकडी वस्तूंचे सामान ठेवण्यात आले होते. या सामानाला आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. लाकडी सामानामूळे क्षणार्धातच या आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. तर याच्या शेजारीच असलेल्या इमारतीमध्ये बँक, लॉंड्री आणि ज्वेलर्सची दुकाने होती.

    डोंबिवली : डोंबिवली पूर्वेच्या फडके रोडवरील इमारतीला लागून असणाऱ्या बंद असलेल्या गोडाऊन मध्ये आग लागल्याची घटना आज सकाळी घडली. या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसते तरी यामध्ये बंद गोडाऊन मधील लाकडी वस्तू पूर्णपणे जळून खाक झाल्या.

    डोंबिवली पूर्वेतील फडके रोडवर प्रियदर्शनी नावाची तळ अधिक १ मजल्याची इमारत आहे. या इमारतीमधील पहिल्या मजल्यावर बंद असलेल्या घरात नको असलेल्या लाकडी वस्तूंचे सामान ठेवण्यात आले होते. या सामानाला आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. लाकडी सामानामूळे क्षणार्धातच या आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. तर याच्या शेजारीच असलेल्या इमारतीमध्ये बँक, लॉंड्री आणि ज्वेलर्सची दुकाने होती.

    आग लागल्याचे समजताच पटापट या व्यापाऱ्यांनी ही दुकाने बंद करत सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. तर या मजल्यावर राहणाऱ्या सुमेधा कर्वे या कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. अग्निशमन दलाच्या डोंबिवली विभागातील ३ गाड्यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी या इमारतीच्या मागे असणाऱ्या झाडाच्या फांद्या जाळल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.