ठाणे शहरातील रेमंड कंपनीच्या आवारात भीषण आग, सर्व सामान जळून खाक

ठाणे शहरातील (Thane City) वर्तकनगर येथील परिसरात असलेल्या सर्वात मोठ्या रेमंड कंपनीच्या (Raymond Company ) आवारात भीषण आग (A huge fire broke out) लागल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज बुधवारी (Wednesday)  सकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली.

 ठाणे : ठाणे शहरातील (Thane City) वर्तकनगर येथील परिसरात असलेल्या सर्वात मोठ्या रेमंड कंपनीच्या (Raymond Company ) आवारात भीषण आग (A huge fire broke out) लागल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज बुधवारी (Wednesday)  सकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली. तसेच या घटनेची माहिती अग्निशमन दलाला (Fire brigade) मिळाली असता, अग्निशामक दलाच्या ४ गाड्या आणि ५ वॉटर टँकर (Water Tanker) तसेच पोलीस (Police) देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रेमंड कंपनीच्या एका ऑफिसला (Office) ही आग लागली असून, हे ऑफिस एक मजली आहे. ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार ही आग सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास लागली. आगीमध्ये या ऑफिसमध्ये असलेले सर्व सामान जळून खाक झाले आहे.

दरम्यान,  आगीवर नियंत्रण मिळवण्यावर अग्निशमन दलाला यश आले आहे. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाहीये. परंतु ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.