आटगावजवळ लोकलचा डबा घसरला; रेल्वे वाहतूक तीन तास ठप्प

लोकलचा डबा रेल्वे रुळावर (railway track) घसरल्याने आटगाव ते कसारा वाहतूक ठप्प (Railway traffic jam for three hours) झाली. या लोकलच्या डब्यात १० ते १२ प्रवासी होते. या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याचा मध्य रेल्वेने दावा केला आहे. आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

मध्य रेल्वेच्या (central railway) आटगाव (Atgaon station) स्टेशन जवळ आज सकाळच्या (morning time) सुमारास लोकलचा ४ था डबा (A local coach)  रुळावरून घसरला. ही लोकल कसाराकडे (Kasara) येत होती. लोकलचा डबा रेल्वे रुळावर (railway track) घसरल्याने आटगाव ते कसारा वाहतूक ठप्प (Railway traffic jam for three hours) झाली. या लोकलच्या डब्यात १० ते १२ प्रवासी होते. या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याचा मध्य रेल्वेने दावा केला आहे. आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल साडेतीन तास झालेल्या खोळंब्यामुळे नोकरदारवर्गाला मनःस्ताप सहन करावा लागला. शिवाय, डाउन मार्गावरील (Down way) लांबपल्ल्याच्या गाड्याही रखडल्या होत्या. मात्र, लोकलचा डबा कशामुळे घसरला याचे नेमके कारण अद्यापपर्यंत समजले नाही. घसरलेला डबा ट्रॅकवर आणण्यासाठी कल्याण व इगतपुरी येथून कामगार व यंत्रणा उपलब्ध करण्यात आली. १० वाजून ३८ मिनिटांनी लोकलचा घसरलेला डबा ट्रॅक वर ठेवण्यात आला. त्यानंतर ११ वाजून १२ मिनिटांनी संथ गतीने वाहतूक सुरू करण्यात आली.

दरम्यान, कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून सर्वसामान्यांना लोकलमधून प्रवासास बंदी करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील कामगारांनाच रेल्वेतून प्रवासास मुभा देण्यात आली आहे. अत्यंत कमी प्रमाणात लोकांना प्रवासाची मुभा देण्यात आल्याने लोकलच्या फेऱ्याही मर्यादित प्रमाणात चालवण्यात येत आहेत. परिणामी जर नियमितपणे लोकल सेवा सुरु असती व गर्दी असती तर मोठा अनर्थ झाला असता. परंतु सुदैवाने कोणालाही जीवितहानी झालेली नाही.