murder

नवी मुंबईच्या नेरूळमधील सेक्टर १० या ठिकाणी संदेश पाटील आणि पल्लवी पाटील हे जोडपं राहत  होतं. १० वर्षांपूर्वी त्यांचा प्रेमविवाह झाला होता. त्यांना एक मुलगीदेखील आहे. सध्या कोरोनाचा फैलाव शहरात अधिक असल्याने तिला त्यांनी गावी नातेवाईकांकडे ठेवलं होतं. संदेशला पल्लवीच्या चारित्र्यावर संशय होता. या संशयातूनच त्याने पत्नीची हत्या करण्याचा निर्णय़ घेतला. 

    एका पतीने आपल्या पत्नीची हत्या केल्याची घटना नवी मुंबईतील नेरूळमध्ये घडलीय. या इसमाने पत्नीची हत्या केली आणि त्याच अवस्थेत घराबाहेर पडून पोलीस स्टेशन गाठलं.

    नवी मुंबईच्या नेरूळमधील सेक्टर १० या ठिकाणी संदेश पाटील आणि पल्लवी पाटील हे जोडपं राहत  होतं. १० वर्षांपूर्वी त्यांचा प्रेमविवाह झाला होता. त्यांना एक मुलगीदेखील आहे. सध्या कोरोनाचा फैलाव शहरात अधिक असल्याने तिला त्यांनी गावी नातेवाईकांकडे ठेवलं होतं. संदेशला पल्लवीच्या चारित्र्यावर संशय होता. या संशयातूनच त्याने पत्नीची हत्या करण्याचा निर्णय़ घेतला.

    झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय असणारा संदेश रात्री ९.३० च्या सुमाराला घरी आल्यानंतर त्याने थेट हातोड्याने वार करून आपल्या पत्नीला बेशुद्ध केलं आणि तिच्यावर चाकूचे वार करून तिची हत्या केली. त्यानंतर मेहुण्याला म्हणजेच पल्लवीच्या भावाला फोन करून घटनेची कल्पना दिली आणि स्वतः पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांना घडलेला प्रकार सांगितल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या ठिकाणी पल्लवीचा रक्तबंबाळ अवस्थेतला मृतदेह त्यांना सापडला.

    पोलिसांनी संदेशला अटक केली असून त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.