भिवंडीतुन मुंबईला ट्रक घेऊन जाणा-या व्यक्तीस कोरोनाची लागण

भिवंडी : भिवंडी शहरातून कोरोना विषाणू संसर्ग काळात धान्याची ट्रक वाहतूक करणाऱ्या एक २३ वर्षीय व्यक्तीस कोरोना लागण झाल्याचे स्पष्ट झाले. या रुग्णा सोबत भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णांची संख्या १३ पोहचली आहे .

 भिवंडी : भिवंडी शहरातून कोरोना विषाणू संसर्ग काळात धान्याची ट्रक वाहतूक करणाऱ्या एक २३ वर्षीय व्यक्तीस कोरोना लागण झाल्याचे स्पष्ट झाले. या रुग्णा सोबत भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णांची संख्या १३ पोहचली आहे.

          शहरातील कामतघर राजीव गांधी नगर मध्ये राहणार २३ वर्षीय ट्रक चालक सध्या सुरू असलेल्या लॉक डाऊन काळात धान्य घेऊन गोवंडी माहीम या भागात ये जा करीत असताना त्यास कोरोनाची लागण झाल्याचे बोलले जात आहे. त्यास घरी असताना ताप जाणवू लागल्याने महानगरपालिका फिव्हर क्लिनिक मध्ये तपासणी केली असता कोरोना सदृश लक्षण आढळून आल्याने त्यास टाटा आमंत्रण येथील क्वॉरंटाईन केंद्रात २५ एप्रिल रोजी दाखल करून त्याचे स्वब तपासणी साठी पाठविले असता ते पॉझिटिव्ह आढळले असल्याची माहिती महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ जयवंत धुळे यांनी दिली असून भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात एकूण १३ रुग्ण असून त्यांच्यावर स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती कोव्हिडं १९  रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती दिली आहे .