सार्वत्रिक निवडणुका पुढे ढकला – आम आदमी पक्षाची मागणी

कल्याण : राज्य निवडणूक आयोगाच्या १९ जुनच्या पत्रानुसार ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोबिंवली महानगरपालिकेची सार्वजनिक निवडणुका ठरल्या कालावधीत घेण्याचे नियोजित असल्याचे नमूद केले आहे. मात्र कोरोनाचा

 कल्याण : राज्य निवडणूक आयोगाच्या १९ जुनच्या पत्रानुसार ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोबिंवली महानगरपालिकेची सार्वजनिक निवडणुका ठरल्या कालावधीत घेण्याचे नियोजित असल्याचे नमूद केले आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी आम आदमी पक्षाचे कल्याण लोकसभा अध्यक्ष अॅड. धनंजय जोगदंड आणि रवींद्र केदारे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची लोकसंख्या अंदाजे साधारणतः अठरा लाखाच्या जवळपास आहे. एवढ्या मोठ्या जनसंख्येचा निवडणूक कालावधीत सक्रिय सहभाग होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. कल्याण डोंबिवलीत दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिकेकडे अपुरी कार्यपध्दती, अर्थव्यवस्था यामुळे महानगरपालिकेच्या दवाखान्यात रुग्णांवर होत असलेले उपचार हे अपुरे असल्याचे प्रकर्षाने समोर आले आहे. सध्याच्या अर्थव्यवस्थेमुळे डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय व सफाई कर्मचारी यांना योग्य ते साहित्य मिळालेले नाही. तसेच औषधांचा पुरवठा देखील पुरेसा नाही. त्याचप्रमाणे निवडणूकीदरम्यान निवडणूक प्रचाराच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होण्याची १००% शक्यता आहे. त्यामुळे कोरोना बाधितांचा/मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत निवडणुकीकरीता लाखो-करोडो रुपये वायफळ खर्च करणे उचित होणार नाही. त्यामुळे निवडणूक महत्त्वाची की, नागरीकांचे आरोग्य याचाही आपण विचार करून तुर्तास महापालिकेच्या निवडणूकीचा कार्यक्रम पुढे ढकलण्याची मागणी आम आदमी पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली असल्याची माहिती रवींद्र केदारे यांनी दिली.