ashram shala issue meeting

कल्याण : राज्यातील आश्रम शाळा कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे संचालक शरद अहिरे व स्वराज्य शिक्षण संघ यांच्यात पुणे येथील संचालक कार्यालयात बैठक संपन्न झाल्याचे माहिती स्वराज्य शिक्षक संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष रणधीर शिंदे यांनी दिली आहे.

कल्याण : राज्यातील आश्रम शाळा कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे संचालक शरद अहिरे व स्वराज्य शिक्षण संघ यांच्यात पुणे येथील संचालक कार्यालयात बैठक संपन्न झाल्याचे माहिती स्वराज्य शिक्षक संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष रणधीर शिंदे यांनी दिली आहे.(aashram school issues will be solved soon)

या बैठकीत आश्रम शाळा कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन, भविष्य निर्वाह निधी ,जिल्हा स्तरावर सहाय्यक आयुक्त कार्यालयात आश्रम शालेय कामकाजासाठी शिबिर लावणे , कर्मचाऱ्यांचे वरिष्ठ वेतन श्रेणी निवडश्रेणी, कालबद्ध पदोन्नती व कर्मचारी लाभाचे प्रस्ताव वेळेत मंजूर करणे, न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे अधिकाऱ्यांना ४२०० रुपये ग्रेड पे मिळणे, वंचित कर्मचाऱ्यांना सातवा वेतनाचे लाभ मिळणे. मेडिकल बिलाची प्रतिपूर्ती करोना काळात नियमबाह्य पद्धतीने कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याबाबत वेठीस धरणे, विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणातील अडथळे यावर प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. संचालक शरद अहिरे यांनी संघाने मागणी केलेल्या सर्व प्रश्नांची जलदगतीने सोडवणूक करू असे आश्वासन दिले.

या बैठकीत संचालक शरद अहिरे सहसंचालक विजया पवार इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे अधिकारी, स्वराज्य शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष फत्तेसिंह पवार, ठाणे जिल्हाध्यक्ष रणधीर शिंदे व संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. राज्यातील आश्रम शाळा कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी न लागल्यास पुढील महिन्यात मुंबई आझाद मैदानावर संघाच्या वतीने सचिवां विरोधात आंदोलन करण्यात येईल असा गंभीर इशारा संघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष रणधीर शिंदे यांनी दिला आहे.