तब्बल ५६ गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या अब्दुल्ला इराणीला पोलिसांनी केली अटक, १६ मोटारसायकली आणि ६१ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत

५६ गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या २२ वर्षीय अब्दुल्ला संजय इराणी(Abdulla Irani Arrested) उर्फ सय्यद याला पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतले आहे.

    कल्याण : वसई पोलिसांवर हल्ला(Attack On Police) करणाऱ्या टोळीतील हैदर ईराणी याच्या खडकपाडा पोलिसांनी गेल्या आठवड्यात मुसक्या आवळल्या. त्यानंतर ५६ गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या २२ वर्षीय अब्दुल्ला संजय इराणी(Abdulla Irani Arrested) उर्फ सय्यद याला पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चोरीच्या १६ मोटरसायकली तसेच ६१ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

    अब्दुल्ला ईरानी याच्यावर ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात चेन स्नॅचिंग, जबरी चोरी तसेच वाहन चोरीचे गुन्हे दाखल झाले असून आतापर्यंत २१ गुन्हे उघडकीस आले आहेत.

    रविवारी खडकपाडा पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस ईराणी वसाहतीत शिरले असता अब्दुल्ला ईरानी निदर्शनास आला असता त्याच्यावर पोलिसांनी झडप टाकली. मात्र सराईट गुन्हेगार असणाऱ्या अब्दुल्लाने दोन पोलिसांवर पलटवार केल्याची माहिती मिळाली आहे.

    यासंदर्भात खडकपाडा पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलिस उपनिरीक्षक योगेश गायकर यांनी पोलिसांना धक्काबुक्की करण्यात आल्याचा घटनेला दुजोरा दिला आहे.

    खडकपाडा पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेल्या १६ मोटरसायकली तसेच ६१ ग्रॅम वजनाचे दागिने असे एकंदरीत १२ लाख १५ हजार किमतीचे मुद्देमाल हस्तगत करण्यात आले असल्याची माहिती कल्याणचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सीनिअर इंस्पेक्टर अशोक पवार, क्राईम इन्स्पेक्टर शरद झिने व पोलीस अधिकारी उपस्थित होते.