एपीएमसी मार्केटमध्ये छताचा स्लॅब कोसळल्याची दुर्घटना, नागरिकांमध्ये भितीचं वातावरण

एपीएमसी मसाला मार्केटमधील धोकादायक इमारतीत कोट्यवधींचा कारभार चालतो. परंतु मार्केटमध्ये छताचा स्लॅब कोसळल्यामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.

    मुंबई : एपीएमसी मार्केटमध्ये छताचा स्लॅब कोसळल्याची दुर्घटना घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे मार्केटमधील नागरिकांमध्ये भितीचं वातावरण पसरलं आहे. परंतु सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीत हानी झालेली नाहीये.

    मिळालेल्या माहितीनुसार, एपीएमसी मसाला मार्केटमधील धोकादायक इमारतीत कोट्यवधींचा कारभार चालतो. परंतु मार्केटमध्ये छताचा स्लॅब कोसळल्यामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. एफ विंग मधील दोन दुकानांच्या मध्ये ये-जा करण्याासाठी असलेल्या पॅसेजमध्ये ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.