मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दापचरी इथे कारचा भीषण अपघात – ५ जणांचा जागीच मृत्यू

पालघर : पालघर जिल्ह्यातल्या तलासरी जवळ असलेल्या दापचरी इथे मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात वॅगनार कारमध्ये असलेल्या ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. यात २ पुरुष, २

 पालघर : पालघर जिल्ह्यातल्या तलासरी जवळ असलेल्या दापचरी इथे मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात वॅगनार कारमध्ये असलेल्या ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. यात २ पुरुष, २ महिला आणि एका मुलाचा ही समावेश आहे.

हे लोक पालघर जिल्ह्यातल्या नालासोपारा पूर्वेकडील सेंट्रलपार्क इथून गुजरातच्या दिशेने जात असताना तलासरी जवळ असलेल्या दापचरी इथं यांची कार तिथं असलेल्या डिवायडरला जाऊन धडकली. ज्यामुळे या कारमध्ये असलेल्या पाचही जणांचा मृत्यू झाला. यातले ४ जण हे एकाच कुटुंबातले होते.श्रृती देविप्रसाद शुखला (वय – १६ वर्षे), रैना देविप्रसाद शुखला ( वय – ४२ वर्षे), स्वयम देविप्रसाद शुखला (वय -१० वर्षे), देवीप्रसाद लालमणी शुखला, संजयकुमार विजय तिवारी ( वय- ३६ वर्षे) अशी मृतांची नावे आहेत.