railway canteen theft

कल्याण : कल्याण पूर्वेकडील वालधुनी परिसरात सुरू असलेल्या रेल्वे कॅन्टीनच्या इमारतीखाली पुरून ठेवलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून गडचिरोली जिल्ह्यातील मुकेश पोरेड्डीवार असे या मजुराचे नाव आहे. तो याच बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर पाणी मारण्याचे काम करत होता. दारूच्या नशेत झालेल्या भांडणातून त्याच्या मित्रांनी त्याची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी बबलू उर्फ गुलामअली खान व अकिल अहमद कलीमुद्दीन खान या दोघांना अटक केली आहे.

कल्याण : कल्याण पूर्वेकडील वालधुनी परिसरात सुरू असलेल्या रेल्वे कॅन्टीनच्या इमारतीखाली पुरून ठेवलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून गडचिरोली जिल्ह्यातील मुकेश पोरेड्डीवार असे या मजुराचे नाव आहे. तो याच बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर पाणी मारण्याचे काम करत होता. दारूच्या नशेत झालेल्या भांडणातून त्याच्या मित्रांनी त्याची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी बबलू उर्फ गुलामअली खान व अकिल अहमद कलीमुद्दीन खान या दोघांना अटक केली आहे. (accused arrested in waldhuni railway canteen murder case)

मृत मुकेश हा मजूर दुसरा मजूर बबलू उर्फ गुलामअली खान यांच्या समवेत एकाच खोलीत राहत होता. दररोज त्यांच्यात जेवण तयार करण्यावरून तसेच घरातील काम करण्यावरून भांडणे होत असत. ८ ऑक्टोबर रोजी रात्री १०:३० नंतर दारुच्या नशेत पुन्हा या दोघांमध्ये वाद झाला. या वादातून बबलू याने उल्हासनगरमधील मित्र अकिल अहमद कलीमुद्दीन खानच्या मदतीने नळाचा पाईप आणि लोखंडी शिकंजीने मुकेशच्या डोक्यावर वार करून तसेच ओळख पटू नये यासाठी चेहरा ठेचून त्याचा मृतदेह त्याच इमारतीखाली पुरून टाकला होता.

मात्र रात्रीच्या सुमारास कुत्र्यांनी मृतदेहाचा काही भाग उकरून काढला. १० तारखेला सकाळी पाणी मारत असताना कामगारांना हा मृतदेह आढळला. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. अंगातील कपडे आणि चादरीवरून हा मृतदेह मुकेश याचाच असल्याची ओळख पटवून वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण बानकर,पोलीस निरीक्षक गुन्हे. संभाजी जाधव, डीबी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सरोदे व स्टाफ यांनी ४ तासांच्या आत दोन्ही आरोपींना अटक करुन गुन्हा उघडकीस आणला आहे.