‘टाडा’ कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या आरोपीस अटक, गुन्हे शाखा युनिट-१ ची धडक कारवाई 

टाडा कायद्याची अंमलबजावणी (TADA law enforcement) केल्यानंतर पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीस तब्बल २८  वर्षानंतर ठाणे गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने आरोपी सीताराम उर्फ बबन सुखदेव खोसे(६६) (Accused Baban Sukhdev Khose) याला ता-पारनेर जि- अहमदनगर (Ahmednagar)  येथून अटक केली.

ठाणे : नौपाडा पोलीस ठाण्याच्या (Naupada Police Station) हद्दीत गुन्हेगारी कारवाई केल्याप्रकरणी पोलिसांनी टाडा कायद्याची अंमलबजावणी (TADA law enforcement) केल्यानंतर पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीस तब्बल २८  वर्षानंतर ठाणे गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने आरोपी सीताराम उर्फ बबन सुखदेव खोसे(६६) (Accused Baban Sukhdev Khose) याला ता-पारनेर जि- अहमदनगर (Ahmednagar)  येथून अटक केली. त्याला अधिक चौकशीसाठी नौपाडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

नौपाडा पोलीस ठाण्यात १९२ मध्ये टाडा कलम ३(३)(३) यासह भा.ह.का २५(१)(अ) या गुन्ह्यातील आरोपी सीताराम उर्फ बबन हा फरारी झाला होता. त्याच्यासह अन्य सहकारी यांचाही याच गुन्ह्यात सहभाग होता. मात्र सीताराम उर्फ बबन फरारी झाला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास सुरु असतानाच फरारी आरोपी याला शोधण्याचे काम सुरु होते. त्याच दरम्यान गुन्हे शाखा युनिट-१ चे हवालदार रवींद्र काटकर यांना मिळालेल्या माहितीनुसार सीताराम उर्फ बबन हा त-पारनेर जि-अहमदनगर येथे अस्तित्व लपवून वास्तव्य करीत असल्याचे समोर आले.

गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपी सीताराम उर्फ बबन याला बेड्या ठोकल्या आणि ठाण्यात आणले. त्याला आधी चौकशीसाठी नौपाडा पोलीस ठाण्यात स्वाधीन करण्यात आले. नौपाडा पोलीस अधिक तपास करीत आहेत.