Accused of murder and torture sentenced to life imprisonment

भाईंदर पूर्व आजदनगर झोपडपट्टी जवळच असलेल्या ओमसाई इस्टेट आणि सोनम आशिष इमारतीच्या मध्ये असलेल्या नाल्याजवळ आरोपी मोहम्मद यूनुस शहा आणि त्याचे सहकारी मोहम्मद रोजन उर्फ लंगड़ा राईनी (३१) और जितेंद्र उर्फ जितू तिरथप्रसाद राव (३२) यांनी अमानवी कृत्य केले होते.

ठाणे : भाईंदर मध्ये ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या केल्या प्रकरणी गुन्ह्यातील आरोपीला न्यायालयासमोर सादर साक्षी आणि पुरावे धरून दोषी ठरवीत जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती हेमंत पटवर्धन यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तर न्यायालयाने आरोपी मोहम्मद उर्फ जीरो उर्फ जीरू हाजी मोहम्मद यूनुस शहा याला १३ हजाराचा दंडही ठोठावला. तर याच प्रकरणात समावेश असलेल्या अन्य दोन साथीदार मोहम्मद रोजन उर्फ लंगड़ा राईनी (३१) आणि जितेंद्र उर्फ जितू तिरथप्रसाद राव (३२)  यांना ४ वर्षाचा सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.

भाईंदर पूर्व आजदनगर झोपडपट्टी जवळच असलेल्या ओमसाई इस्टेट आणि सोनम आशिष इमारतीच्या मध्ये असलेल्या नाल्याजवळ आरोपी मोहम्मद यूनुस शहा आणि त्याचे सहकारी मोहम्मद रोजन उर्फ लंगड़ा राईनी (३१) और जितेंद्र उर्फ जितू तिरथप्रसाद राव (३२) यांनी अमानवी कृत्य केले होते. आरोपी मोहम्मद युनूस उर्फ जीरो उर्फ जीरू हाजी मोहम्मद शहा हा त्याच परिसरात राहत होता. त्याच परिसरात राहणाऱ्या ४ वर्षाच्या चिमुकलीला आरोपीने चॉकलेटचे अमिष दाखवून अपहरण केले. त्यानंतर निर्जन ठिकाणी चिमुकलीला नेऊन त्याने अत्याचार करून नंतर तिच्या डोक्यात वजनदार वस्तू मारून तिची हत्या केली.

त्यानंतर अन्य दोन सहकाऱ्यांच्या मदतीने तिचा मृतदेह नाल्याच्या चिखलात फेकून दिला.  सदरची घटना ८ ते १२ जानेवारी, २०१७ मध्ये घडली होती. या प्रकरणी १० जानेवारी २०१७ रोजी गुन्हा दाखल झाला. त्यानंतर पोलिसांनी १४ जानेवारीला आरोपीना अटक केली. सादर प्रकरण ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती हेमंत पटवर्धन यांच्या न्यायालयात अंतिम सुनावणी सुरु होती. या प्रकरणात सरकारी वकील उज्वला मोहोळकर यांनी न्यायालयात १२ साक्षीदार उपस्थित करून त्यांची साक्ष नोंदविली, वैद्यकीय रिपोर्ट आणि परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरून न्यायमूर्ती पटवर्धन यांनी मात्र अत्याचारी प्रमुख आरोपी शहा याला जन्मठेप आणि १३ हजाराचा दंड तर आरोपीचे अन्य सहकारी राईनी आणि राव याना प्रत्येकी ३ हजाराचा दंड आणि ४ वर्षाची  सश्रम कारावासाची शिक्षा आणि दंड ठोठावला.