drama at atre theatre

कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाऊननंतर तब्बल नऊ महिन्यानंतर कल्याणातील आचार्य अत्रे रंगमंदिराची(acharya atre thetre reopen) दारे नाट्य रसिक प्रेक्षक वर्गासाठी खुलली. शनिवारी दुपारी साडे चारच्या सुमारास ‘तु म्हणशील तसं’ या नाटकाचा प्रयोग(drama) आज कल्याणमध्ये झाला.

कल्याण : कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाऊननंतर तब्बल नऊ महिन्यानंतर कल्याणातील आचार्य अत्रे रंगमंदिराची(acharya atre  theater reopen) दारे नाट्य रसिक प्रेक्षक वर्गासाठी खुलली. शनिवारी दुपारी साडे चारच्या सुमारास ‘तु म्हणशील तसं’ या नाटकाचा प्रयोग(drama) आज कल्याणमध्ये झाला. मुंबई ठाण्या पाठोपाठ कल्याण डोंबिवलीतील नाट्यगृह खुली करण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी नुकताच घेतला होता.

आयुक्तांच्या या निर्णयानंतर लॉकडाऊननंतर शनिवारी कोरोना पार्श्वभूमीच्या लॉकडाऊन संकटच्या तब्बल नऊ महिन्यानंतर अभिनेते प्रशांत दामले निर्मित प्रसाद ओक दिगदर्शित ‘तु म्हणशील तसं’ या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग कल्याण पश्चिमेतील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे झाला. शनिवारी होणाऱ्या या पहिल्या नाटकाच्या प्रयोगासाठी अत्रे रंगमंदिर सज्ज होते. कोरोना पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून नाट्यप्रयोग सुरू करण्यात आला.

कोरोना लॉकडाऊन काळात कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी गेल्या ९ महिन्यापासून कल्याण डोंबिवली पालिकेची सावित्रीबाई फुले आणि आचार्य अत्रे नाट्यगृहे बंद होती. या २ पैकी कल्याणातील आचार्य अत्रे रंगमंदिराचा पडदा शनिवारी ‘तु म्हणशील तसं’ या शुभारंभाच्या नाटकाच्या प्रयोगाने उघडला आहे. मुंबई- ठाण्यासह संपूर्ण एमएमआर रिजनमध्ये नाट्य प्रयोग सुरू करणारे आचार्य अत्रे हे पहिलेच रंगमंदिर ठरले आहे. तर २० डिसेंबरला डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृहं पुन्हा नाट्य रसिकांच्या सेवेत रुजू होणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अत्रे रंगमंदिरातील आसनव्यवस्थेमध्ये बदल करण्यात आले आहेत. एक खुर्ची सोडून एक प्रेक्षक बसेल अशाप्रकारे बसण्याची व्यवस्था अत्रे नाट्य मंदिरात करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक प्रयोगानंतर नाट्यगृह सॅनिटाईझ करण्यात येणार आहे. कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे आयुक्त डॉ.. विजय सूर्यवंशी यांनी सपत्नीक शनिवारी ‘तु म्हणशील तसं’ या नाटकांच्या शुभारंभाच्या प्रयोगाला उपस्थिती लावली.

याप्रसंगी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले की, नऊ महिनाच्या प्रतिक्षेनंतर नाट्यगृहाचा पडदा उघडणारे आचार्य अत्रे रगंमंदिर एम् एम् आर् रिजनमधील पहिले नाट्यगृह असुन ‘तु म्हणशील तसं’ या नाट्य प्रयोगाच्या शुभारंभ कोरोना लॉकडाऊननंतर सुरू झाल्याबाबत इतिहासात नोंद होईल. सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करीत नाट्य रसिक प्रेक्षकांनी नाटकांचा आनंद घ्याव या दरम्यान नाट्य प्रयोग सुरु होण्याआधी तु म्हणशील तसं या नाटकातील मुख्य कालाकार संकर्षण कऱ्हाडे यांनी आयुक्तांना पुष्प गुच्छ देत आयुक्तांसह त्यांच्या पत्नीचे आभार मानित आयुक्त यांच्या पत्नी नाट्य कालकार असल्याने नाट्य कलेची जाण असल्याचे म्हटले. आयुक्तांच्या पत्नी कलाकार असल्याचा सुखद धक्का कल्याणकर नाट्यप्रेमी कला रसिक प्रेक्षकांना यानिमित्ताने बसला. यावेळी अत्रे रंगमंदिराचे प्रभारी व्यवस्थापक माणिक शिंदे आणि सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचे प्रभारी व्यवस्थापक दत्तात्रय लदवा यांच्यासह कर्मचारी वर्ग उपस्थित होता.