Acid Attack

शुक्रवार दि.९ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास अब्दुल खान याने रोहित पांडे याच्या मित्रास दिलेल्या धमकीचा जाब विचारण्या करता रोहित पांडे व त्याचे मित्र सुरज पटेल, अभिषेक शर्मा, निलेश कुमार हरिजन, अभिषेक देशमुख हे अब्दुल खान याच्या घरी गेले असता सदर गोष्टीचा सलीम मुस्‍तकीम पठाण व अब्दुल रहीम खान यांना राग आल्याने त्यांनी वरील लोकांशी हुज्जत घालण्यास सुरूवात केली.

भिवंडी : भिवंडी (Bhivandi) शहरातील साई नगर ताडाळी अंजुरफाटा रोड येथे गुरुवारी झालेली क्षुल्लक वादातून शुक्रवारी त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या युवकांवर तीन ते चार जणांनी ऍसिड फेकून हल्ला (Acid attack )केल्याने. ५ जण भाजल्याने जखमी झाले असून त्यापैकी दोन जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Acid attack on 5 youths in Bhiwandi)

शहरातील ताडाळी साईनगर येथील निखिल साळुंखे हा गुरुवारी कामावरून घरी परतत असताना त्या परिसरातच राहणारे भंगार व्यावसायिक अब्दुल रहीम खान व सलीम पठाण यांच्यात भांडण झाले होते. हे भांडण मिटविण्यासाठी सुरज पटेल,अभिषेक शर्मा, निलेश कुमार हरिजन, अभिषेक देशमुख यांनी सोडविले होते. सदर वेळी आरोपी अब्दुल रहीम खान याने रोहित पांडे चा मित्र अभिषेक देशमुख यास धमकी दिली होती.

शुक्रवार दि.९ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास अब्दुल खान याने रोहित पांडे याच्या मित्रास दिलेल्या धमकीचा जाब विचारण्या करता रोहित पांडे व त्याचे मित्र सुरज पटेल, अभिषेक शर्मा, निलेश कुमार हरिजन, अभिषेक देशमुख हे अब्दुल खान याच्या घरी गेले असता सदर गोष्टीचा सलीम मुस्‍तकीम पठाण व अब्दुल रहीम खान यांना राग आल्याने त्यांनी वरील लोकांशी हुज्जत घालण्यास सुरूवात केली. त्यावेळी अब्दुल रहीम खान याने घरातून बकेटमध्ये साठविलेले ॲसिड आणून रोहित पांडे व त्याचे चार मित्र यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या अंगावर टाकून गंभीर जखमी केले सदर वेळी रोहित पांडे याचा मित्र अभिषेक देशमुख यांची पत्नी गायत्री देशमुख ही भांडण सोडवण्याकरता आली असता तिला आरोपी सलीम खान याने त्याच्या हातातील लोखंडी रॉडने मारहाण करून दुखापत केली आहे.

या गुन्ह्यां बाबत रोहित पांडे यांनी नारपोली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरून भादवि कलम ३०७, ३२६(अ),३४ अन्वये गुन्हा दाखल जेल असून सदर गुन्ह्यातील आरोपी अब्दुल रहीम खान हा ऍसिड फेकल्या नंतर खाली पडला असता त्यास सुध्दा ऍसिड लागल्याने तो सुध्दा जखमी झाला असून त्यास शहा हॉस्पिटल अंजुर फाटा येथे उपचारासाठी दाखल आहे तर सलीम पठाण याला सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे.जखमी अभिषेक देशमुख यास मुंबई सायन हॉस्पिटल येथे व अभिषेक शर्मा हा गुरुकृपा हॉस्पिटल भिवंडी येथे उपचारा करीता दाखल असून उर्वरित तीन जखमींना उपचार करून घरी सोडले आहे .सदर गुन्ह्यात वापरण्यात आलेले ऍसिड हे भंगार विकणाऱ्या कडून आणले असावे असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून , दरम्यान या गुन्ह्यातील आरोपी मोहम्मद मुस्तकीम पठाण यांनी वरील जखमी युवकांनी घर समोर येऊन भांडण केल्याची तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.