भरधाव धावणाऱ्या घोड्यांचा व बाईकस्वाराचा अपघात, घोडा जागीच ठार तर बाईकस्वार पोलीस जखमी

कल्याण : टिटवाळ्यात समोरून येणाऱ्या दोन भरधाव घोड्यांनी जोरदार धडक दिल्याने अपघातात दुचाकी स्वार पोलीस हवालदार जखमी तर एक घोडा जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी घडली. टिटवाळा गणपती मंदिर रस्त्यावरील

कल्याण : टिटवाळ्यात समोरून येणाऱ्या दोन भरधाव घोड्यांनी जोरदार धडक दिल्याने अपघातात दुचाकी स्वार पोलीस हवालदार जखमी तर एक घोडा जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी घडली. टिटवाळा गणपती मंदिर रस्त्यावरील घरआंगण सोसायटी जवळील मराठे फॉर्च्युन इमारतीसमोरील रस्त्यावरून चाललेल्या बाईकस्वाराला समोरून भरधाव येणाऱ्या दोन घोड्यांनी जोरदार धडक दिली असता बाईक स्वार जागीच उडून रस्त्यावर पडला तर घोडाही जागीच ठार झाला. 

हा अपघात हा  एमएच ०५ बीएल ८५१५ या बाईकवरून पोलीस हवालदार विजय नाईक हे सकाळी साडेदहाच्या सुमारास टिटवाळा स्टेशनकडे चाललेले होते. त्याच दरम्यान दोन भरधाव धावत आलेल्या घोड्यांचा व त्यांच्यात जोरदार धडक झाली. ही धडक एवढी भरधाव होती की बाईकस्वार पोलीस हवालदार विजय नाईक हे गाडीवरून उडून पडले. त्यांच्या छातीला मुका मार लागला तर पायाच्या गुडघ्या खालून रक्तस्राव सुरू झाला होता.या अपघातात त्यांच्या गाडीची खोपडी तुटून रस्त्यावर पडली. तर दोन पैकी एक घोडा हा या अपघातात जागीच ठार झाला. यावेळी घटनास्थळी  उपस्थितीत  पत्रकार राजु टपाल, पादचारी व पोलीस सहकारी   पोलीस उपनिरीक्षक मुंडे व त्यांचे इतर सहकारी ताबोडतोब पोहचताच जखमी पोलीस हवालदार विजय नाईक यांना रिक्षातुन महागणपती इस्पितळात नेण्यात आले.

पोलीस हवालदार विजय नाईक यांनी बाईक चालवताना हेल्मेट घातले होते. तसेच जिथे अपघात झाला तिथे स्पीडब्रेकर असल्याने त्यांचा गाडीचा स्पीड कमी होता. मात्र उजव्या बाजूला असलेल्या गँरेजच्या रस्त्यावरून ते दोन्ही मोकाट घोडे खूपच जोरात धावत आल्याने तसेच त्यांचा स्पीड ही खूपच असल्याने हा अपघात भयंकर घडला होता.  या अपघाता निमित्ताने टिटवाळ्यातील मोकाट सोडलेल्या घोड्यांच्या मालकावर कारवाई कधी होणार अशी मागणी नागरिकांमध्ये जोर धरू पाहत आहे.