Action against KDMc's unattended vehicle parked on the road

रस्त्यावर नागरिकांना चालणे सोयीचे व सुलभ व्हावे याकरिता रस्त्यावर/रस्त्याच्या कडेला पडून असलेली बेवारस/भंगार वाहने उचलण्याची मोहीम महापालिका प्रभागक्षेत्र अधिकाऱ्यांनी आपआपल्या प्रभाग क्षेत्रात सुरू केलेली आहे.

कल्याण : क.डो.मपा ( KDMc) प्रशासनाने रस्त्यालगत उभ्या असलेल्या भंगार बेवारस वाहनावर कारवाईचा बडगा उगारीत वाहतुक कोंडी व रस्त्यावर नागरिकांना चालण्याचा मार्ग सुकर करण्याबाबत धोरण अवंलबिले आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देशानुसार महापालिका परिसरातील वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी व रस्त्यावर नागरिकांना चालणे सोयीचे व सुलभ व्हावे याकरिता रस्त्यावर/रस्त्याच्या कडेला पडून  ( unattended vehicle parked ) असलेली बेवारस/भंगार वाहने उचलण्याची मोहीम महापालिका प्रभागक्षेत्र अधिकाऱ्यांनी आपआपल्या प्रभाग क्षेत्रात सुरू केलेली आहे.

महापालिका “ग” प्रभागक्षेत्र अधिकारी स्नेहा कर्पे आणि त्यांच्या पथकाने देखील गेले दोन दिवसात रामनगर पोलिस स्थानकातील पोलिसांच्या मदतीने “ग ” प्रभाग परिसरातील नांदीवली रोड, टंडन रोड, आयरे रोड या परिसरातील एकूण ७ बेवारस/ भंगार वाहने (१अंबुलन्स, २ रिक्षा व ४ दुचाकी) हायड्रा व डंपर च्या मदतीने उचलून खंबाळपाडा येथील वाहन तळावर जमा केली आहेत,ही कारवाई यापुढेही सुरू राहणार आहे.