हिरव्या रंगाचे पाणी वाहत असल्याप्रकरणी Ribopham Laboratory कंपनीवर कारवाईचा बडगा

कंपनीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आरोमॅटीक केमिकल करता परवानगी दिली असताना सदर कंपनी हिरव्या रंगाच्या फुड कलर वर प्रक्रिया करत असल्याचे आढळून आले.

    कल्याण : डोंबिवली एमआयडीसी येथील गांधीनगर नाला, येथून हिरव्या रंगाचे पाणी वाहत असल्याचा व्हिडिओ सकाळी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी सदर बाबीची तात्काळ दखल घेऊन एमआयडीसीच्या अधिकारी यांना याबाबत सूचना दिल्या तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव  अशोक शिंगारे यांना याबाबत अवगत केले.

    सदर बाबीची पाहणी करण्याकरिता एमआयडीसी आणि एमपीसीबी च्या अधिकाऱ्यांनी नाल्याची पाहणी केली केली असता नाल्यातील स्टॉर्म वॉटर मध्ये एका ड्रेनेज पाईप मधून हिरव्या रंगाचे पाणी येत असल्याचे निदर्शनास आले, सदर हिरव्या रंगाचे पाणी हे Ribopham Laboratory या कंपनीमधून येत असल्याचे निदर्शनास आले.

    सदर कंपनीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आरोमॅटीक केमिकल करता परवानगी दिली असताना सदर कंपनी हिरव्या रंगाच्या फुड कलर वर प्रक्रिया करत असल्याचे आढळून आले, या कामा करिता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी घेतली नसल्यामुळे सदस्य सचिव महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, अशोक शिंगारे यांनी तात्क़ाळ सोमवारी सायंकाळी कंपनी बंद करण्याबाबतचे आदेश पारीत केले आहेत. त्याप्रमाणे सदर कंपनीचा विद्युत पुरवठा आणि पाणीपुरवठा बंद करणे बाबत आदेशही निर्गमित केले आहेत..