कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क न वापरणाऱ्या ७ दुचाकीस्वारांवर फौजदारी कारवाई

भिवंडी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तोंडाला मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे नियम मोडून दुचाकीवरून प्रवास करीत असल्याचे आढळून आल्याने कोनगांव पोलीस ठाण्यात ७ दुचाकीस्वारांच्या विरोधात फौजदारी

 भिवंडी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  तोंडाला मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे नियम मोडून दुचाकीवरून प्रवास करीत असल्याचे आढळून आल्याने कोनगांव पोलीस ठाण्यात ७ दुचाकीस्वारांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अजित म्हस्के,सुमित म्हात्रे ,अक्षय गुप्ता,कृष्णा राय प्रशांत मलिक, राजकुमार जयस्वाल, भरत राम ब्रिजराम अशी फौजदारी गुन्हा दाखल झालेल्या दुचाकीस्वारांची नावे आहेत. या सर्वांनी तोंडाला मास्क न लावता व सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळता डबल व ट्रिपलसीट प्रवास करून संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन स्वतः च्या व इतरांच्या जीवितास धोका निर्माण केल्याने या
७ जणांवर कोनगाव पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.