वाड्यात रस्ता रुंदीकरणासाठी तोडकाम कारवाई सुरू

वाडा: पालघर जिल्ह्यातील पालघर- वाडा- देवगाव या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी सध्या वाडा शहरात रुंदीकरणाच्या कामात अडथळा येणाऱ्या अतिक्रमित भाग हा सार्वजनिक बांधकाम हे पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीत

वाडा: पालघर जिल्ह्यातील पालघर- वाडा- देवगाव या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी सध्या वाडा शहरात रुंदीकरणाच्या कामात अडथळा येणाऱ्या अतिक्रमित भाग हा सार्वजनिक बांधकाम हे पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीत जेसीबीच्या मदतीने काढण्यात येत आहे. या रस्त्याचे रुंदीकरण १६ मीटर करण्यात येत आहे. या रुंदीकरणासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्ह्यातील पालघर – वाडा देवगाव या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम पावसाळ्यापूर्वी घेण्यात आले होते.पण हे काम संथ गतीने सुरू असल्याची ओरड प्रवाशी जनतेकडून केली जात होती.आज या रस्त्यावरील अतिक्रमित बांधकाम पाडण्यात येत आहे. काही महिन्यांपूर्वी या कामाला रुंदीकरणाला इथल्या व्यापारी असोसिएशनने विरोध केला होता. तसेच आपला विरोध व्यापारीवर्गाने दुकाने बंद करून व्यक्त केला होता. तर ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.वाडा बसस्थानक ते परळी नाका या दरम्यान रुंदीकरणात अतिक्रमित जागेतील अडथळा काढण्यात येत आहे. हे रुंदीकरण कमी करावे , अशी काही व्यापारी वर्गाची मागणी आहे.यावर बांधकाम विभागासोबत चर्चा सुरु आहे.