पनवेल : पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांची बदली ठाणे येथे करण्यात आल्या नंतर महिन्यातच बुधवार २४ जून रोजी अतिरिक्त आयुक्त डॉक्टर प्रशांत रसाळ यांची अंबरनाथ नगरपरिषद येथे

पनवेल  : पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांची बदली ठाणे येथे  करण्यात आल्या नंतर महिन्यातच बुधवार 24 जून रोजी अतिरिक्त आयुक्त डॉक्टर प्रशांत रसाळ यांची  अंबरनाथ नगरपरिषद येथे मुख्याधिकारी म्हणून बदली.करण्यात आली आहे. 
अंबरनाथ येथे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने विद्यमान अधिकारी यांच्या ऐवजी डॉक्टर प्रशांत रसाळ यांचेवर शासनाने विश्वास टाकला आहे. पण पनवेल महापालिकेत कोरोंनाचे रुग्ण वाढत असताना येथील परिस्थिति माहीत असलेल्या आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांच्या बदल्या करून  पनवेलकरांना शासनाने दूसरा धक्का दिला असेच म्हणावे लागेल .  तृप्ती  सांडभोर , प्रादेशिक उप संचालक , नगरपरिषद संचलानलय , कोकण भवन यांची पनवेल महापालिका अतिरिक्त आयुक्त म्हणून  नेमणूक झाली आहे