टिटवाळ्यातील विजेचा खेळखंडोबा पाहून वकील जितेंद्र जोशी यांनी महावितरणला बजावली नोटीस

कल्याण : टिटवाळा येथील महावितरणाकडून वारंवार होणारा खंडित होणारा वीजपुरवठा आणि चुकीची घेतली जाणारी रीडिंग त्यामुळे अवाजावी येणारी बिले , तक्रारींचे योग्य पद्धतीने न होणारे निवारण

 कल्याण :  टिटवाळा येथील महावितरणाकडून वारंवार होणारा खंडित होणारा वीजपुरवठा आणि चुकीची घेतली जाणारी रीडिंग त्यामुळे अवाजावी येणारी बिले , तक्रारींचे योग्य पद्धतीने न होणारे निवारण यांसारख्या  महावितरणाच्या गलथान आणि भोंगळ कारभाराला टिटवाळाकर कंटाळले असुन वारंवार होणारा खंडित वीजपुरवठ्याला कंटाळून येथील वकील जितेंद्र जोशी यांनी महावितरणाला कायदेशीर नोटीस पाठवून झटका दिला आहे. 

 गेली अनेक वर्षे महावितरणच्या कारभाराचा त्रास नागरिकांना वारंवार सहन करावा लागत आहे. याची दाखल घेत येथील वकील जितेंद्र जोशी यांनी वीज ग्राहकांस होणाऱ्या शारीरक , मानसिक आणि आर्थिक त्रासाबाबत महावितरणास कायदेशीर नोटीसच पाठवली आहे.  सध्या चालु असलेल्या संचारबंदीच्या काळात सर्व नागरिक घरात बसून आहेत. वाढत्या रुग्णांमुळे बऱ्याच सोसायटी सील करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत सुद्धा १ – २ नव्हे तर जवळपास ११ तास पूर्ण वीज पुरवठा बंद असल्यामुळे दोन दिवसांपूर्वी नागरिकांना हैराण व्हावे लागले होते.  वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याबाबत अनेक आंदोलने झाली. मात्र अद्यापही ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. ग्राहक तक्रार निवारण कक्षाच्या संपर्क क्रमांकावर संपर्क केला असता थातूर मातुर  उत्तरे देऊन तक्रारीचे निवारण झाले, असा खोटा मेसेज ग्राहकांना पाठविला जातो . त्यामुळे महावितरणाकडून गैरव्यापारी प्रथेचा अवलंब होत असून यामुळे ग्राहकांना शारीरक, मानसिक आणि आर्थिक त्रास होत आहे. सात दिवसांमध्ये हा होणारा त्रास थांबवावा अन्यथा ग्राहकास तक्रारीचे  योग्य निवारण होईपर्यंत महावितरणने प्रतिदिन १००० रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी दिलेल्या नोटीस मध्ये करण्यात आली आहे.  या नोटीसची जोरदार चर्चा सध्या टिटवाळयात होत असून या समस्यांनी त्रासलेले अन्य ग्राहक देखील अश्याच पद्धतीने महावितरणास नोटीस काढण्याच्या पवित्र्यात असल्याचे समजते. त्यामुळे या नोटीशीनंतर तरी महावितरण सुधरेल का ? असा प्रश्न आता येथील नागरिक विचारत आहेत.