पोस्को कायद्यातील आरोपीला अटक करण्याची आफ्रोहची मागणी

विभागीय चौकशीच्या अहवालात मरसकोल्हे दोषी आढळल्याने शाळेच्या मुख्याध्यापकांनी १७-९-२०२० रोजी नागपूर पोलीस स्टेशन येथे आरोपी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. गुन्हा नोंद होऊनही आरोपीला अटक करण्यात आली नाही. मरसकोल्हे हा व्यवसायाने शिक्षक असल्याने गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा फासले आहे.

कल्याण : शाळेतील विद्यार्थिनीवर लैंगिक  ( POSCO Act) अत्याचार करणाऱ्या नागपूर येथील शिक्षक राजेंद्र मरसकोल्हे याला सन २०१८ साली सेवेतून बडतर्फ करण्यात आले. मुख्याध्य्पाकांनी या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करून देखील पोलिसांनी त्याला अद्यापही अटक न केल्याने (Afroh) ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन (आफ्रोह) या संघटनेने या आरोपीला अटक  (arrest) करण्याची मागणी (demands ) जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे.

विभागीय चौकशीच्या अहवालात मरसकोल्हे दोषी आढळल्याने शाळेच्या मुख्याध्यापकांनी १७-९-२०२० रोजी नागपूर पोलीस स्टेशन येथे आरोपी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. गुन्हा नोंद होऊनही आरोपीला अटक करण्यात आली नाही. मरसकोल्हे हा व्यवसायाने शिक्षक असल्याने गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा फासले आहे. त्यामुळे या आरोपीस त्वरित अटक करून कठोर शिक्षा करण्याची मागणी आफ्रोह या संघटनेने महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारयांना निवेदन देऊन केली आहे.