bar and restaurant

ठाण्यातील सर्व हॉटेल आणि चित्रपटगृह आस्थापनांना रात्री साडे अकरापर्यंतच (hotels should not be open after 11.30)परवानगी देण्यात आली आहे. जर  साडे अकरा नंतर हॉटेल खुले दिसले तर सील करण्यात येईल असा इशाराच ठाणे पालिका आयुक्तthane corporation commissioner vipin sharma) डॉ.विपीन शर्मा यांनी दिला.

  ठाणे: ठाण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव(corona in thane) वाढत असून कडक निर्बंध घेण्यासाठी पालिकेची वाटचाल सुरू आहेत. ठाण्यातील रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या हॉटेल,बार,रेस्टॉरंट आणि चित्रपटगृहांना ठाणे महापलिकेने ‘अल्टीमेंटम’ दिले आहे.

  ठाण्यातील सर्व हॉटेल आणि चित्रपटगृह आस्थापनाना रात्री साडे अकरापर्यंतच परवानगी देण्यात आली आहे. जर  साडे अकरानंतर हॉटेल खुले दिसले तर सील करण्यात येईल असा इशाराच यावेळी पालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांनी दिला. ठाणे महापालिकेच्या मुख्यालयात नरेंद्र बल्लाळ सभागृहात बुधवारी हॉटेल चालक आणि चित्रपटगृहाचे मालकांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी महापौर नरेश म्हस्के पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा आणि सहाय्यक आयुक्त यांना आदेश दिले आहेत.

  ठाणे महापालिका हद्दीत दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. हीच वाढती आकडेवारी लक्षात घेता पालिका प्रशासन पुन्हा एकदा कामाला लागली आहे. रुग्ण वाढत असल्याने पालिका प्रशासनाच्या मनात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून कोरोना विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत मार्गदर्शन सूचना देण्यात आल्या आहेत.

  यापूर्वी शासनाकडील विविध आदेशाचे अनुषंगाने ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. ठाण्यातील सर्व सिनेमागृह,हॉटेल,रेस्टॉरंट या आस्थापनामध्ये एकूण क्षमतेच्या ५० टक्केच परवानगी देण्यात आली आहे. तसेच शॉपिंग मॉल संदर्भातही महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. शॉपिंग मॉलमध्ये प्रवेश देताना ग्राहकांना दिलेल्या निर्बंधाचे उल्लंघन होणार नाही. तसेच सर्व नियमाचे पालन करावे असे आदेश पालिका आयुक्तांनी मॉल व्यवस्थापनांना दिले आहेत.

  राज्य सरकार आणि पालिका प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचना तसेच त्रिसूत्री नियमाचे पालन करावे,असे आवाहन करण्यात आले आहे. नियमाचे उल्लंघन करण्यात आल्यास केंद्र शासनाच्या कोविड -१९ महामारी संपल्याचे जाहीर होत नाही तोपर्यंत सिनेमागृह,हॉटेल,रेस्टॉरंट हे पूर्णतः बंद करण्यात येईल, तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियमान्वये दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशाराच पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी बुधवारी घेतलेल्या बैठकीत दिला आहे..

  कार्यक्रमाला परवानगी नाही

  कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. ठाणे महापालिका हद्दीत सामाजिक, धार्मिक, राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमावर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही कार्यक्रमाला परवानगी देण्यात येणार नाही. ज्या ठिकाणी गर्दी होईल त्या ठिकाणी असलेल्या आणि आयोजकांवर कारवाई निश्चित असल्याचे यावेळी सांगितले.

  लग्न समारंभासाठी ५० तर अंत्यविधीसाठी २० व्यक्तींना परवानगी

  लग्नाचे मुहूर्त तोंडावर आले असून लग्न समारंभासाठी आतापर्यंत १०० व्यक्तींना परवानगी देण्यात आली होती. मात्र आता फक्त ५० व्यक्तींनाच उपस्थित असणार आहेत. त्यामुळे लग्न समारंभ ५० लोकांच्या उपस्थितीतच करावा अशी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. तसेच अंत्यविधीसाठी फक्त २० व्यक्तिंनाच परवानगी देण्यात आली आहे. या सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन पालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा आणि महापौर नरेश म्हस्के यांनी केले आहे.

  लॉकडाऊनची परिस्थिती नाही ; प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेची तयारी : नरेश म्हस्के

  ठाण्यात रुग्ण वाढत असले तरी मात्र सर्वांनी सावधानी बाळगणे बंधनकारक आहे. तूर्तास लॉकडाऊनची परिस्थिती नसली तरी लॉकडाऊन भविष्यात होऊ नये यासाठी सहकार्य करावे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, टेस्टिंग रुग्णवाहिका आणि बेडची व्यवस्था करण्यात आली असून नागरिकांनी नियमाचे पालन करावे,असे आवाहन ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी केले आहे.