पती पत्नीमध्ये झाला क्षुल्लक वाद आणि पतीने उचलले हे पाऊल

भिवंडी: भिवंडी(bhivandi) तालुक्यातील पुर्णा या गावात चाळीत राहणाऱ्या पतिपत्नीमध्ये झालेल्या भांडणात पतीने पहाटेच्या सुमारास लोखंडी पाईप डोक्यावर,तोंडावर ,पायावर मारून गंभीर दुखापत करीत हत्या(murder) केल्याची घटना घडली आहे . कविता पांडव  असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे.

पुर्णा गावात कविता ही हमाली काम करणारा पती अशोक पांडव सोबत राहत होती. गुरुवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास या पती पत्नीमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद होऊन तो विकोपाला गेल्यानंतर संतप्त पती अशोकने पत्नी कविताला लोखंडी पाईपने मारहाण करून तिची हत्या केल्यावर तो त्या ठिकाणाहून पळून गेला. या घटनेची माहिती कोणाला नसताना फरार झालेल्या अशोक याने पुणे येथील आपल्या नातेवाईकांस आपण केलेल्या कृत्याची माहिती दिली असता त्यांच्याकरवी ही बातमी नारपोली पोलिसांना समजली .

या हत्येची माहिती समजताच नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी तातडीने पोलीस पथक घटनास्थळी रवाना केले असून पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदना साठी स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात रावण केला असून या प्रकरणी पोलिसांनी फरार पती अशोक पांडव या विरोधात हत्या केल्याचा गुन्हा दाखल केला आहे .