लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर वीज वितरण कंपन्यांकडून ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिलं

कल्याण – लॉकडाऊनच्या काळात विविध प्रकाराचे उद्योग, कंपन्या आणि व्यवसाय ठप्पे पडले होते. तसेच काही जणांना आर्थिक अडचणीचा सुद्धा सामना करावा लागला होता. परंतु आता लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर,वीज

कल्याण – लॉकडाऊनच्या काळात विविध प्रकाराचे उद्योग, कंपन्या आणि व्यवसाय ठप्पे पडले होते. तसेच काही जणांना आर्थिक अडचणीचा सुद्धा सामना करावा लागला होता. परंतु आता लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर,वीज वितरण कंपन्यांकडून ग्राहकांना अव्वाच्या सव्वा म्हणजचे सात ते आठ पटीच्या दुप्पटीने बील आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे येथील संतप्त नागरिकांनी वीज वितरण कंपनीच्या तेजस्वीनी कार्यालयात गोंधळ घातला आहे.

आता अनलॉक १ सुरु आहे. परंतु महावितरण कंपनीने आपल्या ग्राहकांना सरासरी बिल पाठविले होते. त्यामध्ये एका ग्राहकाकडून चक्क सात ते आठ पटीने बिल लावण्यात आले आहे. तसेच येथील अनेक ग्राहकांकडून १८ ते २६ हजार रूपयांचे बील पाठवल्याचं समजलं जात आहे. ग्राहकांकडून वाढीव बिलाच्या तक्रारी येत असून महावितरण कुठल्याही प्रकारचे वाढीव बिल ग्राहकाला देत नसल्याचे महावितरण कडून सांगण्यात आले.

हे बील जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या सरासरी बिलाप्रमाणेच पाठवण्यात आल्याचे महावितरण कंपनींकडून सांगण्यात आले आहे. परंतु सरकारने या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.